-->

एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!

एयरटेलच्या ग्राहकांमध्ये १.२ कोटींनी वाढ : सुधारित 4G नेटवर्कचा परिणाम!



जिओसोबतच्या गेल्या कित्येक महिन्यांदरम्यान सुरू असलेल्या स्पर्धेत एयरटेल मागे पडत असताना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची जाहीर झालेली माहिती त्यांच्यासाठी नक्कीच सुखावणारी असेल. या दोन महिन्यापैकी ऑक्टोबरमध्ये ५० लाख आणि नोव्हेंबरमध्ये ७० लाख ग्राहक जोडण्यात एयरटेल यशस्वी झाली आहे. 4G नेटवर्क मध्ये मोठी सुधारणा करून इतर नेटवर्क्सच्या मानाने अधिक इंटरनेट स्पीड यासाठी प्रमुख कारण असू शकेल असं सांगितलं जात आहे. साधारणतः एयरटेलमध्ये १५ लाख ग्राहक जोडले जात असायचे मात्र या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक एयरटेलकडे वळत असल्याचं दिसून येत आहे.
TRAI या सरकारी संस्थेला दिलेल्या माहितीनुसार एयरटेलने ही कामगिरी केली आहे. या दरम्यान गेले अनेक महीने सलग ग्राहक जोडण्यात यशस्वी झालेली जिओ मात्र अलीकडे ग्राहक गमावताना दिसत आहे! याचं मुख्य कारण म्हणजे IUC अर्थात दुसऱ्या ऑपरेटरला लावलेल्या कॉल्सवर लावण्यात येणारा चार्ज कारणीभूत आहे. अनेक ग्राहक याबाबत नाराज असून एयरटेल व्होडाफोन-आयडियाने सुद्धा हा चार्ज सुरू केला होता मात्र एक दिवसातच यांनी तो रद्द केला आहे. जिओने मात्र तो अजूनही सुरूच ठेवला असून हा चार्ज देण्यास ग्राहकांचा स्पष्ट नकार दिसत आहे.
व्होडाफोन-आयडियाच्या भवितव्याबाबत आता तितकी शाश्वती नसल्याने आणि या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यापासून सुरू झालेल्या विविध समस्या थांबायचं नाव घेत नसल्यामुळे यांचे ग्राहक पोर्ट करत आहेत. जिओ IUC चार्ज घेत असल्यामुळे ते नको आणि BSNL चं 4G अद्याप उपलब्ध नाहीच. यामुळे ग्राहकांना सध्यातरी एयरटेल हाच उत्तम पर्याय दिसत आहे. शिवाय नेटवर्कमध्ये केलेला सुधार जागोजागी पाहण्यात येत आहे. काही ठिकाणी एयरटेलचा इंटरनेट स्पीड 50-60Mbps वेग गाठत असल्याचं निदर्शनास आलं आहे!
कॉलिंग व डेटासाठीही प्लॅन्स भले जिओपेक्षा फार स्वस्त नसले तरी जवळपास तेव्हढयाच दरात अमर्यादित कॉलिंग सोबत डेटा मिळत आहे. शिवाय सेवेबाबत झालेले बदल सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. Xstream, Wynk सारख्या अॅप्सद्वारे ग्राहकांना उत्तम कंटेंटसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे.
हा लेख एयरटेलच्या बाबतीत चांगलं मत प्रदर्शित करणारा भासत असला तर वास्तविक स्थिती सांगणारा आहे याची नोंद घ्यावी. जिओचे ग्राहक वाढल्यानंतर कमी होत गेलेला इंटरनेट स्पीड आपण सर्वानी अनुभवलाच असेल. व्होडाफोन-आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्र येण्याआधी चांगली सेवा द्यायच्या असंही मत पाहायला मिळत आहे. स्पीडचा विषय अर्थात तुम्ही सेवा वापरत असलेल्या ठिकाणावर अवलंबून आहे. शेवटी टेलिकॉम कंपन्याची स्पर्धा ग्राहकांच्याच फायद्याच्या ठरणार आहेत. मात्र एकच कंपनी सलग अनेक महीने यशस्वी होत असल्यास ते एकूण व्यवस्थेसाठी चांगलं चिन्ह नसतं. त्यामुळं अशा प्रकारे जिओसोडून इतर टेलिकॉम कंपन्यासुद्धा टक्कर देत असल्याच पाहिजेत. अन्यथा स्पर्धा संपून परत ग्राहकांना सर्वात पुढे असलेल्या कंपनीच्या मनमानीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

realme X2 स्मार्टफोन व realme Buds Air वायरलेस इयरबड्स सादर !

realme X2 स्मार्टफोन व realme Buds Air वायरलेस इयरबड्स सादर !










गेले अनेक दिवस चर्चा सुरू असलेला रियलमी X2 फोन आणि रियलमी बड्स एयर हे वायरलेस इयरबड्स आज भारतात सादर झाले आहेत. अॅपलच्या एयरपॉड्स प्रमाणे दिसणारे हे बड्स एयर कमी किंमतीमुळे नक्कीच लोकप्रिय होतील, विशेष म्हणजे यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुद्धा सोय देण्यात आलेली आहे! याची किंमत ३९९९ असणार असून हे फ्लिपकार्टवर २३ डिसेंबरपासून उपलब्ध होतील. बाकी फोन्सच्या बाबतीत वेगाने आघाडी घेत असलेली ही रियलमी कंपनी आता इतर उत्पादने सुद्धा सादर करत करत त्या त्या क्षेत्रात जम बसवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
realme Buds Air एका चार्जवर सलग तीन तास चालू शकतील. याच्या चार्जिंग केससह १७ तास चालू शकेल. टच द्वारे आज्ञा देण्याची सोय सुद्धा यामध्ये आहे. डिझाईन पूर्णपणे अॅपलच्या एयरपॉडसारखंच आहे मात्र हे अधिक रंगात उपलब्ध आहेत.
realme X2 मध्ये FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला असून 3D Curved Glass Design पाहायला मिळेल. कॅमेरासाठी मागे चार आणि पुढे 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. मुख्य कॅमेरा 64MP असून 8MP वाईड अॅंगल, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर लेन्स दिलेली आहे. यामध्ये Snapdragon 730G प्रोसेसर दिलेला असून गेमिंगसारख्या गोष्टीसुद्धा यावर सहज करता येतील! याचा नवा In-display Fingerprintस्कॅनर 0.36 सेकंदात फोन अनलॉक करतो!

यावेळी realme PaySa नावाची एक सेवा जाहीर करण्यात आली असून या सेवेद्वारे विविध आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत! कर्ज घेणे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, रीचार्ज, बिल भरणा, पैशांची देवाणघेवाण अशा गोष्टी एकच अॅपद्वारे करता येतील. हे अॅप लघु मध्यम उद्योग आणि सामान्य ग्राहकांसाठी उपयोगी ठरणार आहे. पर्सनल लोन, बिझनेस लोन, मोबाइल स्क्रीन इन्शुरन्स, फ्री क्रेडिट रिपोर्ट मिळेल.

डिस्प्ले : 6.4-inch (16.2cm) dew-drop Fullscreen Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G
GPU : Adreno 618
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.1 + Up to 256GB external memory
कॅमेरा : 64MP Quad Camera + 8MP Wide angle + 2MP Portrait lens + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4000mAh 30W VOOC Flash Charge 4.0 (5V, 6A in box)
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6 customized by realme
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 2.1+EDR,4.0,5.0
सेन्सर्स : GPS/Beidou/Galileo, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor
रंग : Pearl Green, Pearl White, Pearl Blue
किंमत :
6GB+64GB ₹१६९९९
6GB+128GB ₹१८९९९
8GB+128GB ₹१९९९९



सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम

सोशल मीडिया आणि न्यूज : फसव्या शीर्षकांचे दुष्परिणाम

सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव त्याचबरोबर सहजरित्या व स्वस्तात उपलब्ध असणारे इंटरनेट यांमुळे अनेकांचा कल सोशल मीडियावरील न्युज वाचण्यात व पाहण्याकडे रूपांतरित होताना दिसत आहे. परंतु यामुळे याचे अनेक दुष्परिणामसुद्धा आपणासमोर येत आहेत. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. सोबतच यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही नजर टाकणार आहोत.
एखाद्या आर्टिकल/न्यूज पेजला किंवा व्हिडीओला मिळणाऱ्या व्हूजवरून तत्सम कंपनी/वेबसाइट/सोशल मीडिया पेज /चॅनलला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याकारणाने आजकाल अनेकांचा ओढा खळबळजनक, फसव्या, कुतूहलात टाकणाऱ्या, सनसनाटी व्हिडिओज/पोस्ट/आर्टिकल्सद्वारे लोकांना आकर्षित करण्याकडे वाढला आहे. या कारणास्तव अनेकदा चांगला महत्वाचा कंटेंट आपणसमोर येत नाही. शिवाय हा कंटेंट मुख्यत्वे भावनात्मक असल्याकारणाने वस्तूनिष्ठ गोष्टींवरूनही फोकस कमी होताना दिसतो. अनेकांचा खूप वेळ अशामुळे वाया तर जातोच शिवाय त्याचे काही मानसिक व सामाजिक दुष्परिणामसुद्धा अनेकांना भोगावे लागत आहे.
सोशल मीडिया कंपन्यांचा प्रमुख उद्देश हा असतो की शक्य तितक्या वेळ वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवणे किंवा वापरण्यास भाग पाडणे जेणेकरून याद्वारे त्यांना आर्थिक फायदा होईल. यासाठी अनेकदा ह्यूमन सायकलॉजी (मानवी मनाच्या) आणि त्याच्या कार्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची मदत घेऊन त्यांचे डिझाईन व अल्गोरिदम (म्हणजेच ग्राहकांना पुढे कोणती पोस्ट/व्हिडीओ दाखवला जाईल याबद्दलचा प्रोग्रॅम) तयार केले जातात. हे अल्गोरिदम वापरकर्त्यांच्या पूर्वी पाहिलेल्या पोस्ट त्याचबरोबर लाईक्स, शेअरच्या मदतीने पुढील पोस्ट्स ठरवतात यामुळे अनेकदा खोट्या बातम्या, क्लिक-बेट (म्हणजे काय ते पुढे पाहुयातच..) वापरकर्त्यांसमोर येतात. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात…
समजा एखादा वापरकर्ता अमुक एक राजकीय पार्टी, व्यक्ती, विचाराचा समर्थक/विरोधक असल्यास त्याच्या न्यूज फीड किंवा यूट्यूब अकाऊंटवर त्याच पद्धतीचे पोस्ट दाखवले जातात जेणेकरून त्याकडून प्लॅटफॉर्मचा वापर होत राहावा. यांमुळे अनेकदा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येत नाही, शिवाय फेक न्यूज, क्लिक-बेट वगैरेचा समावेश न्यूज फीड मध्ये वाढतो. या कारणास्तव अनेकदा सोशल मीडिया वरील न्यूज/ व्हिडीओज वरून अनेक गोष्टींबद्दल चुकीचे मत बनविले जाते. त्याचबरोबर याचा आणखी एक दुष्परिणाम असा की, एखाद्या गोष्टींबद्दलचे विरुद्ध मत समोर आल्यास वापरकर्त्यांमध्ये ती ऐकून घेण्याची मानसिकता कमी होताना दिसते.

क्लिक-बेट म्हणजे काय ?

अनेकदा फेसबूक/ट्वीटर न्यूज फीड, यूट्यूबवर आपणास पुढीलप्रमाणे पोस्ट/ व्हिडीओ दिसत असतीलच. ‘हे पाहून/वाचून आपणास आश्चर्य होईल..’, ‘यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत..’, ‘या आहेत 10 अमुक अमुक महत्वाच्या गोष्टी..’ वगेरे. या अशाप्रकारच्या फसव्या व कुतूहल वाढवणाऱ्या, सनसनाटी हेडलाइन्स द्वारे लोकांना क्लिक करण्यास भाग पाडले जाते आणि खरेतर यां व्हिडीओज, आर्टिकल्स किंवा बातम्यांमध्ये काहीही महत्वाची माहिती नसून लोकांना वेबसाइटवर घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न असतात. अशा फसव्या व कुतूहल जागवून लोकांना क्लिक करण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या/पोस्टनाच क्लिक-बेट (Click-bait) म्हटले जाते.
क्लिक-बेट सारखे लेख वाचण्याची सवय अशा वापरकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने महत्वाचे लेख/संपादकीय पेजेस वाचने अशा वापरकर्त्यांना जड जाते. खरेतर हा आणखी एक मानसिक दृष्ट्या होत असणारा दुष्परिणाम आहे.
व्हॉट्सअॅपवर सुद्धा हल्ली खुपसाऱ्या बातम्या सत्यता न तपासताच शेअर केल्या जातात. याकारणास्तव फेक न्यूजचा प्रसार होण्यास मदतच होते. मागील वर्षी व्हॉट्सअॅपतर्फे याबद्दल जनजागृती मोहीम राबविण्यात आली होतीच.
वरील गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण खालील उपाययोजना करू शकता
एखाद्या न्युज साईट किंवा सोशल मीडिया पेजवर सतत क्लिक-बेट, खळबळजनक व्हिडिओज पोस्ट केले जात असतील तर अशा पेजेसला अनफॉलो करणे. त्याचबरोबर वेबसाइटवरील न्यूज वाचण्याएवजी ई-पेपर, किंवा प्रिंट मीडियाला (न्यूज पेपर किंवा मॅगझिन्स ) प्राधान्य देणे. याचा आणखी एक फायदा असा की ऑनलाइन पेपर वाचण्याच्या तुलनेत आपण कमी वेळात खुपसारी माहिती मिळवू शकतो.(आपण स्वतः नक्कीच हा प्रयोग करून पाहू शकता!)
तुमच्या न्यूज फीड मध्ये असे पोस्ट दिसत असल्यास त्या पोस्टवर दिसणाऱ्या सेटिंग्ज (तीन डॉट्स आयकॉन) वर क्लिक करून आपण ‘Hide Post/ See Fewer Post Like This/ Unfollow Page’ असे पर्याय निवडू शकता. याचपद्धतीने आपण यूट्यूबवरील व्हिडीओ जवळ असणाऱ्या सेटिंग्जवर क्लिक करून ‘Not interested’ पर्याय वापरू शकता.
अफवा, खोट्या बातम्या पसरविणाऱ्या व्हॉट्सअॅ ग्रुपमधून बाहेर पडणे. तसेच अशा पद्धतीचे फॉरवर्ड करणाऱ्यांना ग्रुप मधून काढून टाकणे.फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून ज्या गोष्टी पोस्ट/सेंड केल्या जातात त्यामध्ये बर्‍यापैकी असत्य गोष्टी जास्त असतात.अफवा, खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या भावना भडकावल्या जाऊन गैर-प्रकार आणखी वाढतात.
खरेतर वरील अनेकसाऱ्या गोष्टींमध्ये वापरकर्त्यांपेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जास्त कारणीभूत असूनही (याचे प्रमुख कारण ह्यूमन सायकलॉजीचा आर्थिक फायद्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून केला गेलेला वापर) याचे दुष्परिणाम हल्ली सामान्य नागरिक तसेच समाजावर दिसून येत आहेत. आमचा अनुरोध आहे की आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करावा आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना अमलात आणाव्यात.

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?


यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface)
यूपीआय ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते! सोबतच यामध्ये peer to peer रक्कम जमा करण्याची पद्धत ज्यामध्ये सोयीनुसार नियोजित दिवशी आणि गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते.
यूपीआयमधून पैसे पाठवताना लॉगिनची गरज नाही, खातेक्रमांकांची गरज नाही, IFSC ची गरज नाही.
केवळ एका छोट्या यूजरनेम (वापरकर्त्याच नाव) ज्याला यूपीआयमध्ये VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हटलं जातं या VPA सहाय्याने कोणालाही अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवता येतात!
यूपीआयची गरज काय ?
नेटबँकिंगसारख्या पद्धती इंटरनेटवर व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सादर करण्यात आल्या. पण यावरून पैसे पाठवणे बर्‍यापैकी वेळखाऊ आणि सामन्यांच्या दृष्टीने अवघड आहे. त्यासोबतच बर्‍याच पर्यायांच्या गर्दीने नेमकी कोणती सेवा घ्यायची याविषयीसुद्धा गोंधळ उडतो! म्हणूनच एका सरळसोप्या पद्धतीची सुरुवात केली गेली असून याचं नाव यूपीआय असं आहे. ही पद्धत सर्व दिवशी कोणत्याही सुट्टीविना वापरता येते. आणि यासाठी तुमच्याकडे असलेल्या मोबाइलचा वापर केला जातो!
समजा तुम्ही जवळच्या दुकानामध्ये गेलात किंवा कोणाला पैसे खात्यावर पाठवायचे असतील तर त्यावेळी पैसे देताना तुम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळवून बँकमध्ये beneficiary जोडावी लागते. त्याला वेळ लागू शकतो तसेच दरवेळी OTP टाका बसावा लागतो. प्लॅस्टिक मनी जसे की क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना तुमचा पिन सुरक्षित राहत नाही. मोबाइल वॉलेटला त्या वॉलेटमध्ये रक्कम भरावी लागते. या सर्वावर उपाय म्हणजे यूपीआय यामध्ये थेट बँकमधून व्यवहार होतो.


मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधील फरक : पेटीएमसारख्या मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधला फरक म्हणजे वॉलेटमध्ये बँकमधून रक्कम भरावी लागते मगच ते वॉलेट वापरता येते. तसेच वापर झाला नाही तर मोबाइल वॉलेटमध्ये पैसे बिनव्याजी तसेच पडून राहतात. मात्र यूपीआयमध्ये थेट बँकखात्यातून व्यवहार केला जातो. त्यामुळे निम्मा वेळ वाचून सहज पैसे पाठवता येतात! यूपीआय एकच्या बँक खात्यामधून सरळ दुसर्‍याच्या खात्यात जमा होतात.  
यूपीआयमुळे मोबाइल वॉलेट लगेच बंद होतील अशी परिस्थिती सध्या नसली तर भविष्यात यूपीआयचा वापर वाढीस लागून मोबाइल वॉलेटमध्येच यूपीआयचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे!
यूपीआयचे उपयोग :
सध्या यूपीआयद्वारे ती सर्व कामे करता येतात जी नेटबँकिंगने करता येतात! (पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, रीचार्ज, बिल भरणा, तिकीट आरक्षण,खरेदी,इ.)
सध्या मोबाइल वॉलेट प्रसिद्ध असले तरी यूपीआयमधील सोपेपणा लक्षात येताच याचा वापर नजीकच्या काळात नक्कीच वाढेल आणि इतर ठिकाणी जसे की टॅक्सी, कॅब, रिक्षा अशा ठिकाणी सुद्धा यूपीआयचा वापर होईल.
यूपीआय कसे वापरायचे ?
I. मोबाइल अॅप (ऑनलाइन – इंटरनेट असताना)
II. USSD (ऑफलाइन-इंटरनेट शिवाय)
I. यूपीआय मोबाइल अॅप : यासाठी तुम्ही अॅप स्टोअरवर जाऊन तुमच्या बँकचं नाव टाकून पुढे UPI लिहा आणि सर्च करा. तुम्हाला बँकचं UPI अॅप दिसेल. उदा SBI UPIAxis UPIICICI UPIPhonePeGoogle Tez इ. जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी UPI अॅप्स सादर केली आहेत. याऐवजी फ्लिपकार्ट तर्फे सादर केलेलं PhonePe फोनपे हे अॅपसुद्धा वापरू शकता. जवळपास 25 हून अधिक यूपीआय अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सर्वच अॅप सारखच काम करणार आहेत आणि यातलं कोणताही अॅप घेतलं तरी ते सर्वच बँक खाते धारकांना चालणार आहे!
“फोनपे” वापरण्याची पद्धत खाली दाखवली आहे. इतर अॅप्ससुद्धा थोड्याफार बदलाने असेच काम करतील.
टीप : ह्यास स्टेप्स मोठ्या वाटत असल्या तरी अजिबात अवघड नाहीत. स्पष्टता यावी म्हणून अधिक विश्लेषण केलं आहे. खरेतर या सर्व पायर्‍यांसाठी केवळ  पाच मिनिटाहून कमी कालावधी लागतो!  
१. सर्वात आधी PhonePe अॅप डाऊनलोड करा.
२. यानंतर तुमचा फोन क्रमांक टाका आणि verify करा. लक्षात ठेवा हा फोन क्रमांक तुमच्या बँकला जोडलेलाच असायला हवा आणि हाच कायम वापरला जाईल! Verify वर टॅप करताच SMS द्वारे OTP मिळेल. तो टाका आणि Verify करा.
३. यानंतर काही प्राथमिक माहिती जसे की तुमचं नाव, ईमेल आयडी विचारल जाईल तो टाका आणि नंतर एक चार अंकी पिन सेट करा. लक्षात ठेवा हाच पिन तुम्हाला दरवेळी वापरावा लागणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पिन निवडा. I Accept वर टिक करा आणि Activate Account वर टॅप करा.
४. यानंतर तुमचा VPA निवडा. तुमचं नावच असलं पाहीजे असं नाही. तुमच्या मनाप्रमाणे लक्षात ठेवता येईल असे नाव निवडा. उदा. myupi@ybl, testupi@sbi  नाव टाकल्यानंतर Create New VPA वर टॅप करा.
(लक्षात ठेवा हे नावच पुढे तुमच्या व्यवहारांसाठी वापरले जाणार आहे!)
 VPA abc@sbi अशाच स्वरुपात असतील हे case sensitive नाहीत म्हणजे ABC@sbi व abc@sbi एकच!
४. यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडायला सांगितलं जाईल. आणि तुम्ही योग्य ती बँक निवडताच लगेच तुमचं अकाऊंट तयार होईल. जर तुमच्याकडे MPIN नसेल तर नवा तयार करा व SET PIN वर टॅप करा.
अन्यथा RESET MPIN निवडून जुना MPIN बदलून नवा लावता येईल.
(काही जणांना दरम्यान तुमच्या कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारले जातील व पिन विचारला जाईल. जर आधी MMID वापरला असेल वगैरे कारणास्तव, जे काही विचारले जाईल ते टाकत जा)
५. यानंतर तुम्हाला फोनपे सुरू झालेल दिसेल. आता तुम्ही कधी केव्हाही व्यवहार करू शकता!
वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर अॅप डाऊनलोड करा, फोन क्रमांक टाका, फोनपेसाठी पिन, MPIN सेट करा झाल अकाऊंट तयार.
व्यवहार करताना चार अंकी फोनपे पिन आणि सहा अंकी MPIN यांची गरज पडते.

यूपीआयद्वारे पैसे कसे पाठवायचे ?
वरील प्रमाणे यूपीआय अॅप इंस्टॉल करा आणि नंतर पुढे जा
१. आता Transfer Money खालील Send पर्याय निवडा.
२. आता तुम्हाला Contacts, VPAs, Bank Accounts असे तीन पर्याय दिसतील.
३. तुम्ही कसे पैसे पाठवणार आहात त्यानुसार पर्याय निवडा आम्ही उदाहरणार्थ VPA निवडत आहोत.
४. आता Add VPA वर क्लिक करून Beneficiary VPA मध्ये ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा VPA टाका व नंतर Verify वर क्लिक करा. त्यांचं नाव खाली आपोआप दिसेल! आता Confirm वर टॅप करा
५. आता किती रक्कम पाठवायची आहे ते टाइप करा व Send वर टॅप करा.
६. शेवटी तुम्हाला खात्री करण्यासाठी MPIN विचारला जाईल व लगेच पैसे ट्रान्सफर सुद्धा होतील!
वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर पैसे पाठवताना अॅप उघडा > Phone Number & PhonePe पिन टाका > Send > VPA टाका Verify करा > रक्कम टाका > MPIN टाका > झाले पैसे ट्रान्सफर !!!
याचप्रमाणे तुम्ही रीचार्ज, खरेदी, बिल भरणा करू शकता! तुमच्या बँक खात्यामधील शिल्लक सुद्धा तुम्ही लगेच ह्या अॅप मध्येच तपासता येते!
पैसे स्वीकारण्यासाठी Request हा पर्याय निवडा. व ज्यांच्याकडून पैसे हवे आहेत त्याचा VPA निवडा. त्यांना तसा मेसेज जातो व ते लगेच तुम्हाला पैसे पाठवू शकतात!
यूपीआय वापरासाठी काही बँकच्या नियमांनुसार आधी एकदा बँक मध्ये तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवायला हवा. ज्यानंतर तुम्हाला MMID मिळेल. अधिक माहितीसाठी लेखाच्या संदर्भ घ्या : NCPI Registration Process
रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया केवळ एकदा करावी लागेल जी नवं कार्ड घेण्यासारखी किंवा नेटबँकिंग सुरू करण्यासाखीच आहे. याद्वारे तुम्हाला userid व mpin पुरवला जाईल. याबद्दल तुम्ही तुमच्या बँक शाखेमध्ये चौकशी करा आणि USER ID व MPIN मिळवा!
II. यूपीआय साठी ऑफलाइन पद्धत म्हणजे USSD द्वारे व्यवहार :
यूपीआयद्वारे ऑफलाइन व्यवहार NUUP (National Unified USSD Platform) म्हणता येईल.
USSD म्हणजे आपण बॅलन्स तपासण्यासाठी जसे *121# सारखे क्रमांक डायल करतो तेच.
USSD – Unstructured Supplementary Service Data
आरबीआयने सर्व बँक खातेधारकांसाठी एकच क्रमांक सादर केला असून तो *99# असा आहे.
यामध्ये सुद्धा MMID व MPIN ची गरज पडते.
पैसे पाठवताना तीन पर्याय उपलब्ध
a. MMID द्वारे : ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाइल क्रमांक व MMID लागतो.
b. खाते क्रमांकद्वारे : यामध्ये अकाऊंट नंबर, IFSC लागतो.
c. आधार क्रमांकाद्वारे : जर आधार कार्ड बॅंकला जोडले असेल तर हा पर्याय वापरता येतो.
बाकी यामध्ये अॅप इतक्या सोयी नसल्या तरी या पद्धतीच वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी साध्या फीचर फोन पासून स्मार्टफोन पर्यन्त सर्वच फोनमध्ये चालतं. तेसुद्धा इंटरनेट शिवाय! त्यामुळं याचा उपयोग अनेकांना होऊ शकतो!
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संदर्भ NUUP Product Overview
भीम अॅप : आता सरकारतर्फे नवं अॅप भीम सादर करण्यात आलं असून यामधून सुद्धा यूपीआय द्वारेच व्यवहार केले जातात. याविषयी मराठीटेकचा व्हिडिओ नक्की पहा.
Bhim – Bharat Interface for Moneyडाऊनलोड लिंक : Bhim App on Google Play


पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!


पासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…?!?!थोडक्यात सांगायच झाले तर तुम्ही फक्त ‘पासवर्ड मॅनेजर’ चा मास्टर पासवर्ड हा  एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि बाकी सर्व पासवर्ड पासवर्ड मॅनेजर लक्षात ठेवेल. इथे तुम्ही फक्त पासवर्डच नाही तर आणखी ही माहिती साठवू शकता जसे नोट्स, डॉक्युमेंट, फॉर्म फिल्स आणि बरेच काही…

आजकाल खूप सारे पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे तस जिकिरीचेच काम. त्यातच डाटा लीक, पासवर्ड लीक सारख्या बातम्या वारंवार कानावर पडतातच. खुद्द गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं सुद्धा अकाऊंट LinkedIn च्या लिक झालेल्या पासवर्डमुळे  हॅक झाल होतच आणि जसजसे आपण डिजिटल होत जाऊ व ऑनलाईन बँकिंग पासून बाकी साऱ्या गोष्टी वापरायला लागू तसे अशाप्रकारचे धोके वाढणार आहेतच, त्यासाठीच क्लिष्ट आणि अंदाज न व्यक्त करता येण्यासारखा पासवर्ड असणे ही महत्वाची बाब बनली आहे.

गूगल क्रोम, फायरफॉक्ससारख्या ब्राऊजरमध्ये सुद्धा त्यांचा स्वतःचा पासवर्ड मॅनेजर दिलेला असतो तरी ते तितके सुरक्षित नसून ते हॅक होऊ शकतात एवढेच नव्हे तर जर कोणाला तुमच्या पीसीचा अॅक्सेस असेल तर  ते ही सहजरीत्या पाहू शकतात. आता तर क्रोमच्या फोन आवृत्तीमध्ये पासवर्ड पाहणं अधिक सोपं करण्यात आलं आहे!
खूप  सार्‍या वेबसाइट, त्यांचे वेगवेगळे पासवर्ड (खर तर आपले पासवर्ड किती सारखे असतात हे सांगायला नकोच). पासवर्ड हा किचकट व अंदाजे सहज ओळखता येण्यासारखा नसावा आणि अशा खूप  सार्‍या गोष्टींपासून सुटका करण्यासाठीच पासवर्ड मॅनेजर उपयोगी पडतात.

Lastpass, Dashlane, Keeper, Password Boss, EnPass etc असे अनेक पर्याय आपणा समोर आहेतच. परंतु लास्टपास हे मोफत, प्रसिद्ध आणि सुरक्षित असल्या कारणाने आपण त्याबद्दल आणखी जाणून घेऊया…
Lastpass मध्ये साठवलेले सर्व पासवर्ड आणि माहिती ही Encrypted (सांकेतिक भाषेत) साठवलेली असते (Lastpass स्वतः सुद्धा तुमचा Encrypted पासवर्ड/डाटा पाहू शकत नाही) जरी Lastpass चा डाटा लीक झाला तरी त्याचा उपयोग करता येत नाही. AES-256 bit encryption with PBKDF2 SHA-256 व salted hashes यांचा वापर केला जात असल्यामुळे लास्टपासचा डाटा हॅकरकडे गेला तरी ते त्याला decrypt करू शकत नाहीत. पासवर्ड मॅनेजरचा मुख्य उपयोग पासवर्ड सेव्ह करण्यासाठी असला तरी आपण महत्वाचे डॉक्युमेंट्स, नोट्स वगेरे सुद्धा साठवू शकता.
तुम्ही तुमचे Lastpass अकाउंट Lastpass मोबाईल अॅप, वेबसाईट, क्रोम एक्स्टेन्शन अशा सर्वच ठिकाणी वापरू शकता. आणि तुम्ही एकदा पासवर्ड सेव्ह केला की दरवेळेस Lastpass स्वतःच  एका क्लिक वर वेबसाईट वर लॉगिन डिटेल्स  भरेल. बऱ्याच वेळा क्लोन वेबसाईट वर पासवर्ड इनपुट करण्यापासून ही Lastpass आपणाला वाचवू शकते. आता LastPass अँड्रॉइडच्या AutoFill ला सुद्धा सपोर्ट करतं.   
तर आता आपण lastpass कसं वापरायचं ते पाहू…
प्रथमतः Lastpass अँड्रॉइड अॅप किंवा Extension डाऊनलोड करा त्यानंतर तुम्हाला Lastpass Account तयार करावे लागेल.  (तुम्ही फक्त lastpass.com या वेबसाईट वर जाऊन सुद्धा अकाउंट ओपन करू शकता आणि जेव्हा हवे असेल तेव्हा कोणत्याही माध्यमातून तुमचे पासवर्ड पाहू शकता.)
यानंतर स्वतःचा वापरतला ईमेल टाकून पुढे जा. कृपया मास्टर पासवर्ड काळजीपूर्वक टाका. Lastpass किंवा कोणत्याही पासवर्ड  मॅनेजरचा मास्टर पासवर्ड विसरलात तर पुन्हा सर्व पासवर्ड मिळवणं अवघड आहे. तसेच Lastpass चा पासवर्ड हा कोठेही न वापरलेला, क्लिष्ट आणि किचकट असावा. हा मास्टर पासवर्ड आपल्याला एकच पासवर्ड असेल जो इथून पुढे लशात ठेवायचा आहे. आपण Two Step Verification (द्विस्तर पडताळणी) सुद्धा अॅड करू शकता. चांगला पासवर्ड कसा ठेवायचा याबद्दल आणि Two Step Verification बद्दल  आमचा हा लेख पाहू शकता –  येथे क्लिक करा

जर तुम्ही एखाद्या वेबसाइटवर असताना पासवर्ड बदलला/reset केला तर Lastpass स्वतःच तुम्हाला जुना पासवर्ड नवा पासवर्डने अपडेट करू का असं विचारेल (जर नाहीच विचारलं तरीसुद्धा तुम्ही अकाऊंट ओपन केल्यानंतर + आयकॉन वर क्लिक करून खालीलप्रमाणे भरू शकता.)
यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाइट वर असाल तेव्हा Lastpass स्वतःच खालीलप्रमाणे माहिती भरेल
आणि नवीन पासवर्ड टाकताना Generate करण्यासाठी आयकॉन सुद्धा उपलब्ध  करून देईल.
तसेच तुम्ही Lastpass Security Check वर क्लिक करून तुमचे पासवर्ड किती सुरक्षित आहेत ते पाहू शकता आणि बदलू शकता. यामुळे अवघड पासवर्ड सेट करणं आणि साठवून ठेवणं सोपं जातं. 
Lastpass वापराबद्दल काही महत्वाच्या सूचना :-
• सुरवातीला तुम्ही Gmail किंवा पासवर्ड रीसेट करणे खूपच अवघड असणार्‍या वेबसाइट सोडून बाकी सर्वांचे पासवर्ड Generate करू शकता (आणि हो पाहिजे तेवढा मोठा आणि सर्व प्रकारचे Character असणारा पासवर्ड ठेवायला विसरू नका). Gmail महत्वाचा असल्यामुळे त्याचा पासवर्ड लक्षात ठेवणं उत्तम.
• कृपया Lastpass स्वतःच्या पीसी/लॅपटॉप/स्मार्टफोन शिवाय इतर कोठेही वापरू नका. उदा. दुसर्‍यांचा लॅपटॉप, कामाच्या ठिकाणचा पीसी, इतरांचा स्मार्टफोन. 
• Lastpass चा पासवर्ड जीमेलवरुन (किंवा जो ईमेल असेल तिथून) रीसेट करता येत असल्याकारणाने तुमचं जीमेल चा पासवर्ड सुद्धा खूप सुरक्षित व स्ट्रॉंग असला पाहिजे.
• तुम्ही Lastpass चा emergency अॅक्सेस सुद्धा देऊ शकता जेणेकरून तुम्ही मास्टर पासवर्ड विसरल्यास तुमच्या विश्वासू  व्यक्ती पासवर्ड रिसेट करण्यासाठी विनंती करेल. परंतु हे करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सूचना :- खूप वेळा अनेकांकडून असेही ऐकतो की “मला काय गरज आहे पासवर्ड मॅनेजरची? मला पासवर्ड लक्षात आहेतच सर्व.” परंतु आपण विचार करण्याची गरज आहे की तुमचे पासवर्ड खरंच किचकट, क्लिष्ट आणि अंदाज न व्यक्त करता येण्यासारखे आहेत का ? तुमच्या एखाद्या अकाउंटचा ती साईट हॅक झाल्यावर पासवर्ड लीक झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या अकाउंट वर  होऊ शकतो का? असे प्रश्न स्वतःला विचारून सर्व अकाऊंटची तपासणी करून घ्या. Security Question च उत्तर सुद्धा कोणीही सांगू शकेल असं अजिबात ठेऊ नका. तिथे खरं उत्तर लिहावं असं काही बंधन नसतं



एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर एस. टी.चे वेळापत्रक माहिती नसते, बसस्थानकावर दूरध्वनी लावला तर तो व्यस्त किंवा व्यवस्थित ऐकू येत नाही. अशा स्थितीत स्थानकावर जाऊनच बसच्या वेळेची माहिती घ्यावी लागत होती; परंतु आता मोबाईलवर व वेबसाईटवर वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पाऊल उचलले आहे SMS सेवा आता वापरात नसून त्याऐवजी महामंडळाची वेबसाइट वापरू शकता. (Update Dec 2017)

इथून खालील लेख आता कालबाह्य झाला आहे याची नोंद घ्यावी.
बसच्या वेळापत्रक मोबाईलच्या एका बटनावर आता उपलब्ध होणार आहे. GET-jalgaon nasik असे टाइप करून 54646 क्रमांकावर संदेश पाठविल्यास जळगावहून नाशिकला जाणाऱ्या दिवसभरातील गाड्यांची माहिती उपलब्ध होईल.
उदा. तुम्हाला सोलापूरहून पुण्याला जायचं असेल तर GET-solapur pune हा मेसेज 54646 वर पाठवा.
जेथून जावयाचे आहे, त्या गावाचे नाव व कोणत्या गावाला जायचे आहे त्याचे नाव टाइप केल्यास संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध होईल.
याशिवाय www.msrtc.gov.in या वेबसाइटवरही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अगदी ग्रामीण भागातील वेळापत्रकही उपलब्ध करण्यात आले आहे.
msrtc st bus timing in marathi booking

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०१९ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

गूगल या सर्च इंजिनवर रोज आपण बर्‍याच गोष्टीचा शोध घेतो. याची गूगलकडे वेळोवेळी नोंद होते आणि त्यानंतर गूगल आपल्या संबंधित असेच सर्च रिजल्ट्स दाखवतं. दरवर्षी डिसेंबर महिन्यात गूगल त्या वर्षीच्या सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींची, घटनांची यादी इयर इन सर्च या नावाने प्रसिद्ध करतं. खाली दिलेली यादी आहे २०१९ या वर्षी भारतात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींची…खालील लिंकवर संपूर्ण यादी पाहता येईल तसेच जागतिक पातळीवरील सर्च किंवा ठराविक देश निवडूनसुद्धा पाहता येईल…
संपूर्ण जगभर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी पुढील लिंकवर पहा : Top Global Searches 2019
संपूर्ण यादी पहा : Google Year In Search 2019
Overall (वर्षात सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या गोष्टी)
1) Cricket World Cup
2) Lok Sabha Elections
3) Chandrayaan 2
4) Kabir Singh
5) Avengers: Endgame
6) Article 370
7) NEET results
8) Joker
9) Captain Marvel
10) PM Kisan Yojana
Personalities (सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती) 
1) Abhinandan Varthaman
2) Lata Mangeshkar
3) Yuvraj Singh
4) Anand Kumar
5) Vicky Kaushal
6) Rishabh Pant
7) Ranu Mondal
8) Tara Sutaria
9) Siddharth Shukla
10) Koena Mitra
Movies (हे चित्रपट सर्वाधिक शोधले गेले)
1) Kabir Singh
2) Avengers: Endgame
3) Joker
4) Captain Marvel
5) Super 30
6) Mission Mangal
7) Gully Boy
8) War
9) Housefull 4
10) Uri – The Surgical Strike
Songs (ही गाणी सर्वात जास्त वेळा शोधली गेली)
1) Le Photo Le
2) Teri Meri Kahani
3) Teri Pyari Pyari Do Akhiyan
4) Vaste
5) Coca-Cola Tu
6) Gori Tori Chunari Ba Lal Lal Re
7) Pal Pal Dil Ke Paas
8) Ladki Aankh Mare
9) Payaliya Bajni Lado Piya
10) Kya Baat Hai
Sporting Events (ह्या खेळांच्या स्पर्धांचा शोध)
1) Cricket World Cup
2) Pro Kabaddi League
3) Wimbledon
4) Copa América
5) Australian Open
6) French Open
7) Super Bowl
8) The Ashes
9) US Open
10) Indian Super League
What Is…(ह्यांचा अर्थ शोधला गेला…)
1) What is Article 370?
2) What is exit poll?
3) What is a black hole?
4) What is howdy Modi?
5) What is e-cigarette?
6) What is DLS method in cricket?
7) What is Ayodhya case?
8) What is Article 15?
9) What is surgical strike?
10) What is National Register of Citizens of India?
News (यांच्याबद्दलच्या बातम्यांचा सर्वात जास्त शोध)
1) Lok Sabha election results
2) Chandrayaan 2
3) Article 370
4) PM Kisan Yojana
5) Maharashtra assembly elections
6) Haryana assembly election result
7) Pulwama attack
8) Cyclone Fani
9) Ayodhya verdict
10) Amazon forest fire
Near me (जवळपासच्या या गोष्टींसाठी घेतला शोध)
1) Dance classes near me
2) Salons near me
3) Costume stores near me
4) Mobile stores near me
5) Saree shop near me
6) Air quality Index near me
7) Furniture store near me
8) Toy store near me
9) Electronic stores near me
10) Spa near me
How To…(या गोष्टी कशा कराव्या याबद्दल सर्च)
1) How to vote
2) How to link Aadhar to PAN
3) How to check name in voter list
4) How to check NEET result
5) How to select channels as per TRAI
6) How to remove Holi colour
7) How to play PUBG
8) How to get Fastag
9) How to know polling booth
10) How to file GSTR-9

Fashion

Sport

Hotels