-->

गूगल प्लेवर २०१९ मधील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स जाहीर!



दरवर्षीप्रमाणे गूगलतर्फे वर्षातील सर्वोत्तम अॅप्स गेम्स, बुक्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुगलकडून प्रथमच ‘फॅन फेव्हरेट’ विभागसुद्धा करण्यात आला असून यामध्ये यूजर्सच्या वोटिंगद्वारे विजेता ठरविण्यात आला आहे. चित्रपट, गाणी यांचीसुद्धा यादी अशाच प्रकारे प्रसिद्ध करण्यात आली असून ती तुम्ही गूगल प्ले स्टोरवर जाऊन पाहू शकता!
गूगल वरील सर्वोत्तम अॅप्स, गेम्स, चित्रपट, पुस्तके यांची अधिकृत यादी : Best of Google Play 2019
या विजेत्यांमध्ये ६ प्रकारे विभागणी करण्यात आली असून एकूण गुणवत्ता, डिझाईन, तांत्रिक कामगिरी व नावीन्य यांच्या आधारे ती विभागणी केलेली आहे. खाली ते प्रकार आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अॅप असा उल्लेख आहे. नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राममध्ये अडकून राहणार्‍याना यामधील नावीन्य असलेले अॅप्स वापरुन पहायलाच हवेत…

अॅप्स

२०१९ चं सर्वोत्तम अॅप : Ablo: Talk to new people & explore the world : Best App of 2019 on Google Play
चॅट, व्हिडीओ कॉलद्वारे लाईव्ह ट्रान्सलेशन उपलब्ध करून देणारं हे अॅप २०१९ चं सर्वोत्तम अॅप ठरलं आहे! जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीसोबत आपण आपल्या भाषेत बोलनं सुरु करू शकतो जे भाषांतरित होऊन त्यांना त्यांच्या भाषेत दिसेल!
२०१९ चं यूजर्सना सर्वाधिक आवडलेलं अॅप : Spotify: Listen to your favourite music & podcasts : Users’ Choice App of 2019
स्पॉटिफाय हे गाणी, संगीत ऐकण्यासाठी लोकप्रिय अॅप असून जगभरातील कंटेंट या अॅपमध्ये उपलब्ध आहे.
दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम अॅप : Boosted – Productivity & Time Tracker : Best Everyday Essentials of 2019
तुम्ही रोज कोणत्या अॅपवर किती वेळ घालवता, आज दिवसभरात कोणती कामे केली, कोणती कामे करायची आहेत हे एका जागी सुंदर डिझाईन मध्ये पाहायला मिळतं!
वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी अॅप : Work from Home, Earn Money, Resell with Meesho : Best Personal Growth Apps of 2019
२०१९ ची सर्वोत्तम छुपी रत्ने! : काही वैशिष्ट्यपूर्ण अॅप्स : Best Hidden Gems of 2019
Appy Weather: the most personal weather app
Fitvate – Gym Workout Trainer Fitness Coach Plans
MashApp – Video Punchlines
Morphin – CGI GIF Maker & Editor
Swoot – Podcasts with friends 🙂
२०१९ ची मजेशीर अॅप्स : Best for Fun Apps of 2019

गेम्स

२०१९ ची सर्वोत्तम गेम : Call of Duty : Mobile : Best Game of 2019 on Google Play
अपेक्षेप्रमाणे कॉल ऑफ ड्यूटी : मोबाइलची यावर्षीची सर्वोत्तम गेम म्हणून निवड झाली आहे. हीच गेम यूजर्सच्या आवडीमध्सुद्धा पहिल्या स्थानावर आहे!

चित्रपट

चित्रपट प्रकारात गूगलने स्वतःची आवड जाहीर न करता केवळ यूजर्सच्या आवडीचा चित्रपट निवडला आहे. सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला अव्हेंजर्स एंडगेम इथेही स्थान टिकवून आहे!

Computer व Laptop साठी मराठी टायपिंग Software

Computer व Laptop साठी मराठी टायपिंग Software


संगणकावर मराठी युनिकोड टायपिंग करण्यासाठी google marathi input हे गूगल चे software सर्वोत्तम आहे.
स्पेलिंग टाइप केल्यानंतर आपोआप त्याचे मराठीत रुपांतर होते. ॲन्ड्रॉइडच्या गुगल हिंदी इनपुट या ॲप प्रमाणे हे काम करते.
     हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/inputtools/windows/    या लिंक वर क्लिक करा.
    खालील प्रमाणे पेज येइल......

या पेजवर मराठी या ऑप्शनला टिक करा. व गुगलच्या नियम व अटी मान्यतेला ही टिक करा. (वरील प्रमाणे)
 व डाउनलोड  वर क्लिक करा.
859 kb ची एक फाइल डाउनलोड होइल, ती वर डबल क्लिक करा.( यावेळी संगणकास नेट चालु असणे गरजेचे आहे) 5 ते 10 MB डाटा डाउनलोड होइल, व त्याबरोबर तुमचे टायपिंग टुल ही install होइल.
windows+space दाबून तुम्ही मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये बदल करु शकता....

संगणकावर वापरा Android apps ( How to Install Pubg In Laptop Or Computer)



संगणकावर मिळणाऱ्या softwares पेक्षा android apps हे हे वैविध्यपूर्ण आणि कमी साइझ घेतात,
अनेक वेळा हे apps मोठ्या पडद्यावर वापर व्हावा म्हणून किंवा इतर कारणांसाठी संगणकावर वापरावयाची गरज पडते, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे bluestacks हे software होय.
      हे software वापरासाठी अत्यंत सोपे आहे. एकदा इंस्टाल झाल्यानंतर कोणत्याही apk file वर डबल क्लिक केल्यानंतर ती bluestacks मध्ये इंस्टाल होते. व संगणकावर हे app वापरता येते.


हे software डाउनलोड करण्यासाठी प्रथम www.bluestacks.com या website वर जा.

download for pc या वर क्लिक करा.१४ mb चे installer डाउनलोड होईल.

डाउनलोड झालेल्या file वर डबल क्लिक करून इंस्टाल करा.

bluestacks हे software इंस्टाल होईल.

इंस्टाल झाल्यानंतर हे software चालू करा. यावेळी तुमच्या pc वर net चालू पाहिजे. bluestacks साठी आवश्यक data डाउनलोड होईल. हा data साधारणतः ३०० ते ४०० mb च्या आसपास आहे . net जोडणी slow असेल तर हा data टप्प्या टप्प्या ने डाउनलोड होतो. pc बंद केला तरी डाउनलोड खंडित होत नाही. परत pc चालू केल्यास राहिलेला data डाउनलोड होतो.

संपूर्ण bluestacks इंस्टाल झाल्यानंतर तुम्ही यात app इंस्टाल अथवा डाउनलोड करू शकता. यात play store ची सुविधाही आहे

(टीप - bluestacks साठी संगणकामध्ये ग्राफिक्स कार्ड व साधारणतः १ gb पेक्षा जास्त RAM आवश्यक आहे.
डाउनलोड करण्यापूर्वी तुमच्या संगणकाची  comptibility तपासा.)

BlueStacks चे offline installer ही   www.bluestacks.com  वेबसाइट वर उपलब्ध आहे. साईज -  283MB

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) .

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) .

स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)

२. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते.

३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक करा, usb किंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable करा.




४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
193.168.42.129:8888
असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाकामोबाइल वर एक permission बॉक्स येईल तो accept करा.

५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.



६. स्क्रीन mirroring साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करातुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).

७. याशिवाय AIRDROID  अॅप  वापरून मोबईल मधून data ट्रान्सफरकॅमेरा कंट्रोलकॉल, sms , कॉन्टॅक्ट असे अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop वर वापरू शकतो..

८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  व संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला आहे.

 ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how to root  व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
सर्व टप्पे अचूक पार पाडले तर रूट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

१०.हे अॅप ऑफलाईन चालतेसंगणका वर कोणतेही software  इन्स्टॉल करण्याची गरज नाही, browser मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.

Enjoy screen mirroring........!